रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्मरणिका प्रकाशन: नवी मुंबई (रुपाली वाघमारे): रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी "उत्सव आपला, सत्कार आपल्या पाल्यांचा " या संकल्पनेतून विद्यार्थी गुणगौरव सोहळा व स्मरणिका प्रकाशन इत्यादी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिर, सेक्टर ८ ऐरोली, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ४.४५ वाजता दीपप्रज्वलन आणि मराठी भावगीतांचा संगीतमय कार्यक्रमाने करण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजता आय कार्ड योजनेचा शुभारंभ आणि सर्व सभासद आणि कुटूंबा सह आई तुळजाभवानीची आरती घेण्यात आली. तसेच या सोहळ्यात संघाच्या शाळांमधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, महिलांना पाककला आणि संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्यांनाही पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचा मुख्य अतिथी कामगार कल्याण आयुक्त महाराज्य मा. रविराज इळवे हे असतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे अ...