नरेंद्र पाटलांचा सरकारला इशारा: माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष १ फेब्रुवारीला पुकारला संप:
नरेंद्र पाटलांचा सरकारला इशारा: माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष १ फेब्रुवारीला पुकारला संप: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन-सहकार, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे महाराष्ट्र शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचा निषेधार्थ १ फेब्रुवारी २०२३ रोजी नाईलाजास्तव लाक्षणिक संप पुकारला असल्याचे स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस, माजी आमदार व शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. माथाडी कामगारांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड व अन्य संबंधितांकडे सादर केलेली आहेत, यासंदर्भात अनेक वेळा संयुक्त बैठका झा...