Rakhi Sawant - अभिनेत्री राखी सावंतची आईचे निधन: अभिनेत्री राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देत होती. पण अखेर शनिवारी २८ जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देत होती. पण आज अखेर शनिवारी २८ जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी जुहू येथील सिटीकेअर रुग्णालयात राखी सावंतच्या आईने अखेरचा श्वास घेतला. राखीने याविषयीची माहिती दिली आहे. अखेरच्या क्षणांमध्ये राखी आईसोबतच होती. या महिन्याच्या सुरुवातीला राखीने आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगितले होते. तसेच जया यांची प्रकृती गंभीर असल्याचंही ती म्हणाली होती. जया सावंत यांना ब्रेन ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिग बॉस मराठी ४ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ अपलोड केला होता. यात तिने आई आयसीयूमध्ये असल्याचं सांगितलं होतं. राखीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना चाहत्यांना तिच्या आईच्या आरोग्यासा...