राष्ट्रीय भीमशक्ति संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मोहन वाघमारे यांची नियुक्ती: नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई येथे गेली तीस वर्षांपासून पत्रकारीता करत सामाजिक कार्यात पक्ष विरहित आग्रसर असलेले पत्रकार मोहन वाघमारे यांनी आपल्या गावी सातारा वरुड येथे बुद्ध विहारासाठी भगवान बुद्धाची मुर्ती दान देऊन लोकांची वाहव्वा मिळवली, १९९२ साली सातारा, सांगली व नवी मुंबईत प्रसिद्ध सा. आजचा सातारा सांगली वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करत आहेत. तसेच, महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैनिक नवाकाळ मधे पहिले नवी मुंबई चे प्रतिनिधी म्हणून बातमी दाराचे काम करताना अनेक लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. महाराष्ट्रातील एक मार्गदर्शक दिवंगत निलकंठ खाडिलकर यांचा प्रॅक्टिकल सोशलिझम या संघटनेतर्फे गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गिरणी मालका विरोधात आंदोलनात भाग घेतला होता. कोपर खैराणे नवी मुंबईतील राजपाल हॉस्पिटल मधे गेली २० वर्षांपासून छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले छ. शाहू राजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती, राष्ट्र पुरुष जयंती उत्सव समिती व्दारे त...