बिग बॉस अपडेट: कलर्स मराठीवर बिग बॉस सीजन- 3 मध्ये संगीताचा बादशाह दादूसची धमाकेदार एंट्री..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- रविवार पासुन सुरु झालेल्या कलर्स मराठीवर बिग बॉस सीजन 3 ची दमदार सुरवात झाली आहे. मनोरंजन विश्वात सर्वाधिक टिआरपी खेचणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. बिगबॉसच्या या घरात जाण्याचं अनेक दिग्गजांचं स्वप्न असतं. यंदाच्या सीजन 3 मध्ये बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. मराठी आणि आगरी-कोळ्यांचा बप्पी लहरी अर्थात संगीताचा शानदार आवाज दादूस आपल्याला पाहायला मिळणार आहे बिग बॉसच्या घरात. भिवंडीतील कामतघर येथील दादूस म्हणजे संतोष चौधरी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. दादुस यांना लहानपणा पासूनच संगीताची गाण्याची आवड, दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती. देवीच्या जागरणातून ते गाणी सादर करत. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात. संगीताचा वारसा दादूसला बाबांकडूनच लाभला. “आई तुझा लालुल्या” गाण्याने दादूस ही खरी ओळख मिळाली. लहानपणी दोन्ही पायांमध्ये अपंगत्व होतं मात्र आईने दादूसची सेवा केली आणि दादूसला दोन्ही पायांवर उभं केलं. बायांची गाणी, धौलगीते, क...