ब्रेकिंग न्यूज: नेरुळ मधे धक्कादायक प्रकार- बायकोचा खोटा मृत्यु दाखला बनवून नवर्याने केली संपत्ती हडप:
ब्रेकिंग न्यूज: नेरुळ मधे धक्कादायक प्रकार- बायकोचा खोटा मृत्यु दाखला बनवून नवर्याने केली संपत्ती हडप: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबई नेरुळ येथे जिवंत असलेल्या बायकोचा खोटा मृत्यू दाखला बनवून नवर्या कढून बायकोच्या नावावर असलेली संपत्ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . यामध्ये नेरूळच्या नामांकित रुग्णालयाने महिलेचा मृत्यू दाखला बनवून दिल्याचे समोर आले आहे . त्यानुसार आरोपी पती व रुग्णालयाविरोधात महिलेने पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज दिला आहे. सौ. विजया रेड्डी गंगाडी ( वय ५८ ) या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. त्या जिवंत असतानादेखील त्यांचा मृत्यू दाखला वापरून त्यांची तेलंगणा येथील त्यांची शेत जमीन, नेरूळ पाम बीचचे घर देखील विक्री करण्याचा प्रयत्न. त्याशिवाय त्यांच्या बँकेच्या, शेयर व्यवहारातही या दाखल्याचा वापर करण्यात आला आहे. शेयर बाजारातील पैसे देखील लंपास केले. विजया रेड्डी यांनी आपल्या पतीनेच ही आपली फसवणूक केल्याचा आरोप केला असुन, तसा तक्रार अर्ज त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. दरम्यान, पतीसोबतच्या भांडणाला कंटाळून त्या २०१५ मध्ये आंध्र प्रदेश त्यांच्या ...